जामखेड न्युज——
आई व पत्नीवर कोयत्याने हल्ला, आईच्या फिर्यादी वरून मुलाविरूद्ध जामखेड पोलिसात गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे अज्ञात कारणावरून आई व पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादिने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. आईच्या फिर्यादिवरून आरोपी मूलगा रामचंद्र दशरथ रोडे चोभेवाडी याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ६ आँगस्ट रोजी रात्री १ वाजे सुमारास आरोपी रामचंद्र दशरथ रोडे याने यातील फिर्यादी अलकाबाई दशरथ रोडे (वय६५) व त्यांची सुन उषाताई रामचंद्र रोडे या दोघींना कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे मारहाण केली. यामध्ये आरोपीने ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादिच्या दोन्ही पायाचे घोट्यावर व डावे हाताचे कोपरावर, तसेच फिर्यादिची सून हिचे तोंडावर गळ्यावर, डोक्यावर, हातावर ऊस तोडण्याचे कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करत फिर्यादिला व फिर्यादिची सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आरोपीने सुध्दा घराजवळ असणारे इलेक्ट्रोक डीपीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.तोही जखमी झाला आहे. त्यांच्यावर जामखेड येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पोना सरोदे यांनी घेतलेल्या जबाबावरून भा.द.वि. कलम ३०७, ३०९, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, सपोनि सुनिल बडे, पोसई अनिलराव भारती यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि सुनिल बड़े हे करीत आहेत.