जामखेड न्युज——
आदिवासी भटके विमुक्त व विधवा महिलेला न्याय मिळवून देणारच – अँड. डॉ.अरुण जाधव
कुळधरण ता.कर्जत जि.अहमदनगर येथील भटके विमुक्त आदिवासी समाजातील महिला यांच्या जमिनीच्या वादा संदर्भात व त्यांच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात सिंधुबाई फुलमाळी व ठसराबाई काळे या महिलांना न्याय मिळवुन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अँड डॉ. अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
आज कर्जत तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जे जमीन वहीत करू देत नाही. ठसराबाई काळे, सिंधुबाई फुलमाळी व सुनील सुपेकर यांना नोटीस काढली व जमीनीचा वाद समोरासमोर बसून हा वाद मिटवण्यात येणार आहे. असे तहसीलदार गणेश जगदाळे साहेब यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. व पोलीस केस खोटी दाखल केली होती. त्याची सहनश्या करून जे फिर्यादी आहे. त्यांच्यावरती चुकीचे असल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ साहेब यांनी हमी दिली.
यावेळी शब्बीर भाई शेख वृद्ध भूमिहीन संघटना, तुकाराम पवार जिल्हा समन्वयक पारधी विकास कृती समिती, दिसेना पवार, सत्यशोधक समाज संघटनेचे प्रा. विक्रम कांबळे, नंदकुमार गाडे सर जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दलाचे तालुकाप्रमुख चांगदेव आप्पा सरोदे, लखन पारसे, एकलव्य संघटनेचे सोमनाथ गोरे, रंगीशा काळे, समता न्युजचे राजू शिंदे,राहुल पवार,राजु काळे, संतोष आखाडे,करण ओहळ,सुरज कदम,सतिष झेंडे,जल्मीनाथ काळे, शक्तिमान काळे, सचिन काळे, उत्तम तिरमले, मुकेश चव्हाण,विजया काळे, आशाबाई काळे, शुभांगी गोहेर,फरिदा शेख,शितल पवार,काजोरी पवार, सुनिता काळे, मात्री काळे,त्रिशाली काळे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या आरोपीचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ३१/७/ २०२३ वार सोमवार तहसील कार्यालयासमोर अँड. डॉ अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीने निदर्शने करण्यात आली. अशी माहिती तुकाराम पवार जिल्हा समन्वयक पारधी विकास कृती समिती यांनी दिली आहे.