साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांना पितृश्वोक

0
215

जामखेड प्रतिनिधी

 जामखेड न्युज – – 

      तालुक्यातील साकत येथील सेवानिवृत्त शिक्षक देवराव दिगंबर वराट  (गुरूजी) ( वय ७८) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये निधन झाले. ते २००१ साली सेवानिवृत्त झाले होते.
     साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष तसेच ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट तसेच सचिव कैलास वराट यांचे ते वडील होत.
    देवराव वराट गुरुजी हे सेवेत आसताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही अनेक गोरगरीबांना मदत करत होते तसेच परिसरातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सतत प्रयत्नशील होते. त्यांची ही इच्छा मुलांनी पुर्ण केली संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेमार्फत श्री साकेश्वर ज्युनियर कॉलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी तसेच पब्लिक स्कूल सुरू करून शिक्षण संस्थेचे जाळे निर्माण करून परिसरातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. गुरूजी आबा नावाने ते परिचित होते.
    त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित
 मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here