जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत हजारो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत यामुळे तसेच ना रेमडेसीवीर व कसलेही महागडे औषधे न वापरता रूग्ण बरे झाले आहेत त्यामुळे आरोळे कोविड सेंटरला सामाजिक दातृत्वातुन मदतीचा ओघ सुरू आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीनेही आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार रुपये रोख, वीस क्विंटल धान्य व भाजीपाला मोफत देण्यात आला.
राज्यात कोरोना या महामारीने थैमान घातले असल्याने सर्वांची चिंता वाढत चालली आहे. अशा बिकट प्रसंगी जामखेड येथील आरोळे हॉस्पीटलच्या माध्यमातुन कोव्हीड रुगणावर मोफत उपचार केले जात आहेत. या सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या रुग्णालयास समाजातील सर्व स्तरातुन सर्वतोपरी मदतीचा ओघ चालु असल्याने येथील हजारो कोरोना रुग्णाचे प्राण वाचले आहेत. त्यासाठी आपल्या माध्यमातुन काही मदत झाली पाहीजे या विचारा पोटी जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव ग्रामस्थांनी आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार रुपये रोख, मोफत वीस क्विंटल धान्य व भाजीपाला देण्यात आला.

या वेळी प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे, समन्वयक सुलताना (भाभी) शेख, स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, पै. दत्ता शिंदे, विश्वदर्शनचे संचालक गुलाब जांभळे, स्वाभिमानीचे तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, धोंडपारगावचे सरपंच औदुंबर शिंदे, उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास शिंदे, प्रदिप शिंदे, हभप महादेव शिंदे माजी चेअरमन राजु जाधव, राष्ट्रवादी नेते लाला शिंदे, प्रहार चे सुरेश धुमाळ, विष्णू शिंदे, चेअरमन हनुमंत शिंदे, रुपचंद धुमाळ, अमोल धुमाळ, तुकाराम शिंदे, सुनील धुमाळ, संपत शिंदे, संतोष शिंदे, पोपट धुमाळ, किरण शिंदे, पोपट काटे, बाळासाहेब भांडवलकर, बळी शिंदे, अमोल शिंदे, उपस्थित होते.