जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एप्रिल महिन्यात काही गावातील बोअर व विहिरी अधिग्रहन करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दिले होते तरीही अद्यापही अधिग्रहण आदेश मिळालेले नाहीत. तेव्हा तालुक्यातील काही गावे वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. लोकांची पाण्याची सोय व्हावी म्हणून
आमदार रोहित पवार यांनी यात लक्ष घालुन ताबडतोब अधिग्रहन आदेश काढावेत असे निवेदन महारुळ
गुरेवाडी च्या सरपंच अंजली ढेपे यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील खालील गावे व वाडया येथे पाणी टंचाई भासली असून माहे एप्रील २०२१ पासून विहीर/ बोअर अधिग्रहण केलेले आहे. तसे अधिग्रहन प्रस्ताव पंचायत समिती जामखेड येथे सादर केलेले आहेत.तरी आदयाप पर्यत अधिग्रहन आदेश दिलेले नाहीत त्यामुळे केलेले अधिग्रहन बंद केले असून गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरी आपण यात लक्ष घालुन गावातील पाणी टंचाई दुर करावी असे निवेदन दिले आहे.
सध्या कोरोना काळात गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने गावातील महिला पाण्यासाठी भटकंती करत आहेत. तसेच अधिग्रहन आदेश गट विकास अधिकारी, तहसीलदार जामखेड यांना पारीत करणेस सांगावे असेही म्हटले आहे.
तसेच मागील वर्षी सन २०२० मध्ये देखील ३५ गावात अधिग्रहन केलेले होते त्याचे आदयापही आदेश मिळालेले नाहीत.तसेच अधिग्रहन केलेले लाभार्थीस मोबदला मिळालेला नाही.या बाबात देखील आपण लक्ष घालून ताबडतोब प्रश्न निकाली काढावेत असे म्हटले आहे.
खालील गावात चालु वर्षी अधिगहन केलेले आहे.
१) महारुळी, २) चोभेवाडी – बर्हाणपुर ३) मुंजेवाडी – खाडेनगर, ४) आघी, ५) कुसड़गांव – भोगलवाडी,
६)सरदवाडी, ७) नाहुली, ८) शिऊर, ९ ) दरडवाडी,
१०) नागोबाचीवाडी, ११) मुंगेवाडी, १२) गितेवाडी,
१३ पोतेवाडी, १४ आनंदवाडी, १५) अरणगाव,
१६) पारेवाडी, १७) खांडवी, १८) बोलें
तरी सध्या आदेश न निघाल्यामुळे अधिग्रहन बंद केले असून गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तरी याची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही तरी आपण यात लक्ष घालावे ही विनंती महारुळी च्या सरपंच अंजली ढेपे यांनी निवेदनाद्वारे आमदार रोहित पवार यांना देत यात लक्ष घालून ताबडतोब हा विषय निकाली काढावा अशी विनंती केली आहे.