ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन एकाचा मृत्यू!!!

0
204

जामखेड न्युज——

ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन एकाचा मृत्यू!!!

जामखेड तालुक्यातील राजुरी गावाजवळ
ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर वर बसलेला व्यक्ती शिवाजी संपत काळे ( वय ६० ) रा. पाटोदा गरड यांचा मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.

पाटोदा गरड येथील ट्रॅक्टर विटा घेऊन राजुरी परिसरात चालला होता विटावर संपत काळे बसले होते. उताराला ट्रॅक्टरला ब्रेक न लागल्याने ट्रॉली पलटी झाली आणि त्याच्या खाली पडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती जामखेड येथील पोलीस नाईक अजय साठे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी फोन द्वारे सांगितले असता कोठारी यांनी आपले मित्र निखिल कुमकर यांना घेऊन घटनास्थळी गेले असता त्याचा मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेत आणून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल केला असून त्याचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज शिंदे आणि किशोर बोराडे यांनी करून दिले.

वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here