जामखेड पोलीसांनी घेतले सराईत दागिने चोर महिलेला ताब्यात

0
198

जामखेड न्युज——

जामखेड पोलीसांनी घेतले सराईत दागिने चोर महिलेला ताब्यात

जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा आषाढी एकादशी दिवशी ६ दिवस रथयात्रा भरते. या रथयात्रेनिमीत्त जवळा गावातील शेजारी असलेल्या वाड्यावस्त्यावरील लोक यात्रा पाहण्यासाठी तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी जवळा गावात मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे येथे सुमारे १५ ते २० हजार लोकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढलेले असते. त्यामुळे यावर्षी अशा चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनकडुन सरकारी गणवेशात तसेच साधे वेशात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यास्मीन ठाकुरसिंग भोसले रा. भानस हिवरा, ता.नेवासा जि. अहमदनगर या सराईत दागिने चोर महिलेस जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनांक ३ जुलै रोजी दुपारी २:०० वा. चे सुमारास जवळा गावातील १) सोमनाथ महादेव जाधव रा. ता.जामखेड यांचे लहान मुलाचे ३०० मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम, २) सुनिल बिभीषण शिंगटे रा. पाडळी ता.करमाळालहान मुलाचे १ ग्रॅमचे सोन्याचे बदाम, ३) हनुमंत रामभाऊ सुरवसे रा. देवळाली ता. भुमलहान मुलीचे ३०० मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम, ४) सुभाष रामभाऊ पागीरे रा. मतेवाडी ता. जामखेडलहान मुलीचे ५०० मिली ग्रॅमचे सोन्याचे बदाम असेसुमारे २ ग्रॅम १०० मिली ग्रॅम सोन्याचे बदाम जवळा गावातील यात्रेत चोरीस गेले होते. अशी माहिती तेथे बंदोबस्ताकरीता असणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मिळाली त्यांनी तात्काळ हालचाल करून जवळा गावातच जवळेश्वर मंदीराजवळ एक संशयीत महिला आढळुन आली तिला तात्काळ महिला पोलीस अंमलदार पुजा धांडे, होमगार्ड लोंढे यांनी ताब्यात घेतले.


सदर आरोपी महीला हीस जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव यास्मीन ठाकुरसिंग भोसले रा. भानस हिवरा, ता.नेवासा जि.अहमदनगर असे सांगितले व तिचीमहिला अंमलदार यांनी झडती घेतली असता तिच्याकडे वरील वर्णनाचे २ ग्रॅम १०० मिली वजनाचे चार सोन्याचे बदाम मिळुन आले आहेत. त्याबाबत फिर्यादी सोमनाथ महादेव जाधव वय २७ वर्षे रा. जवळा ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन जामखेड पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. 287/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी यास्मीन ठाकुरसिंग भोसले रा. भानस हिवरा, ता.नेवासा जि.अहमदनगर हीचेवर दाखल असलेले गुन्हे

1) नारायणगाव पोलीस स्टेशन, जुन्नर जि.पुणे गु. रजि. नं. 201/2019 भा.द.वि.क. 379,34
2) येवला तालुका पोलीस स्टेशन, येवला जि.नाशिक गु. रजि.नं. 46/2023 भा.द.वि.क. 379
3) जामखेड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. 287/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक संतोष कोपनर, अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश मांडगे, कुलदिप घोळवे, नवनाथ शेकडे, देवीदास पळसे, सतीष दळवी, महिला पोलीस काॅन्स्टेबल पुजा धांडे, महिला होमगार्ड लोंढे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here