जामखेड न्युज——
दत्तात्रय शंकर अडसुळ यांचे दिर्घ आजाराने निधन
साकत येथील रहिवासी दत्तात्रय शंकर अडसुळ वय 49 यांचे दिर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दत्तात्रय अडसुळ यांनी जामखेड येथे पहिले काँप्युटर इन्स्टिट्यूट टाकले होते. नंतर भांड्याचे दुकान टाकले नंतर दुध संघात अनेक दिवस नोकरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांचे मंगळवार दि. ४ रोजी रात्री अकरा वाजता राहत्या घरी निधन झाले.
दत्तात्रय अडसुळ यांचा अंत्यविधी आज दि. ५ रोजी सकाळी साकत येथे झाला. त्यांच्या मागे एक मुलगी (विवाहित) व एक मुलगा भाऊ असा परिवार आहे.