जामखेड न्युज——
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस निवारा बालगृहातील मुलांसोबत
निवारा बालगृहातील मुलांनी शिकून आएएस, आयपीएस व्हावे – प्रकाश पोळ
जामखेड येथील अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, दलित, भटके- विमुक्त, आदिवासी, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोर-गरिब, कष्टकऱ्यांच्या मुलां-मुलीच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहात शेकडो मुले शिक्षण घेत आहेत. आज या मुलांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले की, निवारा बालगृहातील मुलांनी शिकून आएएस, आयपीएस व्हावे असे सांगितले.
आशिष येरेकर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचा वाढदिवस जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रकाश पोळ BDO साहेब यांनी जि. प. प्रा शाळा मोहा येथील अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार, गरीब शेतकरी, मुलांसमवेत साजरा केला. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन वही,पेन,शालेय साहित्य देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज केले शिक्षकांशी संवाद केला. जि.प.प्रा.शाळा मोहा ही शाळा गुणवत्ता यादी मध्ये आली पाहिजे आदर्श झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांनी आशिष येरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. बापुराव माने, मिसाळ साहेब, कैलास खैरे, सिद्धनाथ भजनावळे, केंद्रप्रमुख मल्हारी पारखे, मुख्याध्यापक संतोष हापटे, रजनीकांत साखरे, श्रीम.पवार मॅडम वैजिनाथ केसकर सर, संतोष चव्हाण सर उपस्थित होते.