जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास हजारो रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. आरोळे भावंडांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. परिसरातील लोकांना मोठा आधार दिला आहे तेव्हा आरोळे कोविड सेंटरला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणूनच अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाताई मुसा शेख यांनी रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून आपला एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला मदत म्हणून दिला आहे. त्यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करून नमाज पठन करतात. रमजान ईदचे औचीत्य साधुन जामखेड तालुक्यातील जवळा गावातील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी चक्क एक महिन्याचा पगार आरोळे कोविड सेंटरला सुपूर्त केला.
महाराष्ट्र तसेच जगावर कोरोणा या विषाणूच्या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस खूप मोठे कोरोना पेशंट वाढत असून त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. या काळामध्ये डॉक्टर रविदादा आरोळे यांनी जामखेड येथे मोफत सुविधा कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तिंना देत आहेत. रमजान ईदचे औचित्य साधुन पवित्र अशा रमजान महित्यात मीनाताई शेख यांनी एक महिन्याचा पगार डॉक्टर आरोळे यांना तो सुपूर्त केला
त्याप्रसंगी डॉक्टर रविदादा आरोळे, जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत (नाना) मोरे, माजी सभापती भगवान मुरुमकर, सुभाष आव्हाड, गटविकास धिकारी कोकणे साहेब, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, अशोक धेंडे, देवदैठन सरपंच दादासाहेब भोरे, नय्युम शेख;, समीर शेख, जिवन रेडे उपस्थित होते.
यावेळी सभापती सुर्यकांत मोरे यांनी मीनाताई शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात पवित्र असे दान केले . त्यांच्या कार्याला सलाम करतो त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांची प्रेरणा इतरांनी घेणे काळाची गरज आहे तसेच येणाऱ्या काळात कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांचा आदर्श घेत पावलावर पाऊल ठेवत खांद्याला खांदा लावून समाज सेवा करत राहणार व डॉक्टर रवि (दादा) आरोळे हॉस्पिटलला सर्व दानशूरांनी मदत करावी असे आवाहन मोरे यांनी केले.