जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड येथील डॉ संजय भोरे यांचा मुलगा यशराज भोरे याने ही त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे चालवला यशराज त्याच्या वाढदिवसाच्या खाऊचा खर्च स्वत:चा वाढदिवस सेलिब्रेशन न करता डॉ आरोळे यांच्या कोव्हिड सेंटर मधील रूग्णांना साठी पाच हजार किमतीच्या व्हिटॅमिन -सी गोळ्या तेथील रुग्णांना देऊन मदत केली.
याप्रसंगी डॉ संजय भोरे, यशराज भोरे, तेजस भोरे, सचिन भोरे, प्रा बहिर सर, कसाब सर, राहुल पवार आदी उपस्थित होते.
मागील वर्षी ही त्याने त्याच्या वाढदिवसाच्या खर्चाची पाच हजार रक्कम जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या कडे तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या मदती साठी दिली होती व तसेच त्यांचे वडील डॉ संजय भोरे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमीत अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा चेक डॉ आरोळे यांच्या कोव्हिड सेंटरला दिला होता व तसेच पाडळी व देवदैठण येथे मोफत मास्क वाटप केले व तसेच तेथील कोरांटाईन असलेल्या एक्कावन् व्यक्तीला किराणा व भाजीपाला किटचे वाटप केले होते तसेच डॉ संजय भोरे हे शिक्षण व आरोग्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा त्यांच्या सनराईज फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे करत असतात.
तसेच यशराज चे आजोबा स्वर्गीय मुरलीधरराव भोरे व पणजोबा एकनाथराव भोरे हे ही देवदैठण गावामध्ये कोणीही गावा बाहेरचा माणुस गावात आला तर त्याचा पाहुणचार , भुकेल्या व्यक्तिला जेवण गरजूंना विविध मदत करत त्यांचा सामाजिक वसा घेवून त्यांच्या पावलावर पाउल ठेऊन चौथ्या पिढीचा यशराज हा अगदी लहान-पणा पासुन जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहे.
त्याचे या छोट्याशा उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.