जामखेड न्युज——
भैरवनाथ विद्यालयाची गीतांजली मोरे दहावीच्या परिक्षेत तालुक्यात प्रथम!!
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावी बारावीच्या परिक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत. विद्यालयाची गीतांजली मोरे हिने ९६.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. दहावीचा निकाल ९६.८२ टक्के तर बारावीचा निकाल ९५.२४ टक्के लागला आहे.
गीतांजली मोरे हिने ९६.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात तसेच विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, दुसरा क्रमांक भोगल प्रणाली ९४.०० टक्के, तिसरा क्रमांक तृप्ती गोयकर ९३.८० टक्के, चौथा क्रमांक कापसे अस्मिता ९२.०० टक्के गुण पटकावले आहेत.
एकुण ६३ विद्यार्थी होते यातील ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, विशेष प्राविण्यासह २५, प्रथम श्रेणी २४, द्वितीय श्रेणीत ०८ तर ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक एस. एम. खान सह सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व तसेच पालक शिक्षक संघ, प्राचार्य रमेश अडसुळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी अभिनंदन केले आहे.