जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील दहावीचा शंकर टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पालक शिक्षक व प्रतिष्ठित नागरीकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दहावी निकाल 2023 श्री साकेश्वर विद्यालय साकत ता. जामखेड विद्यालयाचा निकाल 100 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेस बसलेले एकुण विद्यार्थी 29 विद्यार्थी बसले होते यातील 29 विद्यार्थी पास झाले
प्रथम क्रमांक वराट राधिका रामभाऊ, द्वितीय क्रमांक कडभने वैष्णवी मच्छिंद्र, तृतीय क्रमांक मोहिते तृप्ती संजय, तर चतुर्थ क्रमांक लहाने तेजस्विनी हिने पटकावला आहे. विशेष प्राविण्यासह सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणीत दहा विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक एस. एम. खान सह सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य श्रीराम मुरूमकर, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रा. अरूण वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. अजय वराट, डॉ. सुनील वराट, संतोष देशमुख, गणेश वराट, दादासाहेब वराट, नानासाहेब लहाने, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ सर्व सदस्य, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.