प्रकाश काळे मित्रमंडळाच्या वतीने अदिवासी पारधी समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार अदिवासी पारधी समाजातील मुलांसाठी इंग्लिश मेडियम शाळा सुरू करणार – प्रकाश काळे

0
215

जामखेड न्युज——

प्रकाश काळे मित्रमंडळाच्या वतीने अदिवासी पारधी समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

अदिवासी पारधी समाजातील मुलांसाठी इंग्लिश मेडियम शाळा सुरू करणार – प्रकाश काळे

 

जामखेड तालुक्यातील अदिवासी पारधी समाजातील जे विद्यार्थी दहावी बारावी पास झाले आहेत तसेच ज्या युवकांची विविध क्षेत्रात निवड झाली आहे अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रकाश काळे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला तसेच थोड्याच दिवसात आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अदिवासी पारधी समाजातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणार असल्याची माहिती अदिवासी पारधी समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश काळे यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश माणिकराव काळे अध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ अहमदनगर, दादा पवार, अध्यक्ष जामखेड तालुका, संतोष पिंपळे शहराध्यक्ष जामखेड, माणिकराव काळे, जालिंदर पवार, अनिल काळे, कल्याण काळे, दिलीप काळे, दिपक पवार, गणेश पवार सर, संजय काळे, राहुल काळे, बाळु काळे,आशिष काळे, युवराज काळे, राहुल आहिरे सर, बाबासाहेब काळे,रतन काळे अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष जामखेड, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव पप्पू सय्यद, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे यांच्या सह आदिवासी पारधी समाजातील पुरूष व तरूण मुल मुली, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बारावी उत्तीर्ण झालेल्या 1)अजय अनिल काळे 2)निता दादा पवार 3)आरती अनिल काळे 4)शंभु दीपक पवार तसेच माणिक काळे व प्रणव काळे यांचा वाढदिवस तसेच रमेश काळे राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सागर काळे यांची मुबंई पोलिस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.

यावेळी बोलताना आदिवासी पारधी महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपासून मी समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करत समाजातील इतर मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. तसेच समाजातील मुलांसाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणार असल्याची माहिती दिली. तसेच समाजातील मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपले व समाजाचे नाव उंचवावे असा सल्ला दिला.

गणेश पवार सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here