जामखेड न्युज——
दहावीच्या परीक्षेत ल. ना. होशिंग विद्यालयाचे घवघवीत यश, वीस विद्यार्थी नव्वदी पार

शहरातील नामांकित असलेल्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेत यशाचा आलेख उंचावला आहे.
मार्च २०२३ मध्ये दहावी परिक्षेसाठी एकुण २७९ विद्यार्थी बसले होते यापैकी २६८ उत्तीर्ण झाले आहेत यात १४४ विद्याथी विशेष प्राविण्यासह तर ८१ प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत ४०, उत्तीर्ण ३ अशा प्रकारे शाळेचा एकुण निकाल ९६.०५ टक्के लागला आहे.
नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे वीस विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत
कुलकर्णी अनघा ९५.८० टक्के गुण घेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मेनकुदळे सिद्धी ९४.८० द्वितीय क्रमांक
राळेभात गार्गी ९३.८० तृतीय क्रमांक
पारखे दिप्ती व ढवळे जयदीप ९२.२० टक्के गुण घेत चौथा क्रमांक पटकावला आहे.
याच बरोबर पुढील विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे आहेत.
नागरगोजे कृष्णा, सरडे वैभव, राऊत नुपूर, ढवळे संकेत, काळे प्रिती, पोतदार श्रावणी, राऊत समर्थ, भालेराव तेजस, ढोले साक्षी, कोळपकर यश, सिरसाट सारंग, राऊत गायत्री, राळेभात रितेश, कडभने सिद्धी, कोल्हे रोहन या सर्व विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक एस. एम. खान सह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, पर्यवेक्षक पी. टी गायकवाड सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ यांच्या सह अनेक पालक व प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले आहे.


