जामखेड न्युज——
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत न्यायाधीश सत्यवान डोके यांचा वाढदिवस व उपअभियंता शशिकांत सुतार यांचे स्वागत!!

जामखेडचे सुपुत्र बीड जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके साहेब यांचा वाढदिवस व कालच हजर झालेले जामखेड बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांचे स्वागत नासीर पठाण मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ, पोलीस निरीक्षक महेश पाटील, पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील, माजी सरपंच सुनिल कोठारी, नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे,माजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, महेश निमोणकर, प्राचार्य श्रीकांत होशिंग, एस. एन. पारखे, रमेश अडसुळ, उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, नासीर पठाण, अशोक निमोणकर, सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर, यासीन शेख, जाकीर शेख, जनता टेलर, अँड हर्षल डोके, संग्राम पोले, पिंटूशेट बोरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नासीर पठाण मित्रमंडळाच्या वतीने न्यायाधीश सत्यवान डोके यांचा वाढदिवस तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले शशिकांत सुतार यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्वच मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील हाश्य विनोद सांगितले.



