जामखेड न्युज——
मागील पाच वर्षे तोट्यात असणारी बाजार समिती प्रशासकीय काळात तीन कोटी रुपये नफ्यात कशी – आमदार रोहित पवार
बाजार समितीसाठी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये निधी
मागील पाच वर्षांच्या काळात विरोधकांची सत्ता असताना बाजार समिती तोट्यात होती कारण विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त खर्च केला नंतर अडीच वर्षे प्रशासकाच्या काळात तीन कोटी रुपये नफ्यात आली. या पैशाचा चांगला वापर करा शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्या हिताचे निर्णय घ्या विकास कामे करताना विरोधकांना विश्वासात घ्या असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी उपसभापती कैलास वराट यांच्या पदग्रहण समारंभात दिला तसेच या तीन कोटी रुपयांबरोबरच आमदार रोहित पवार यांनी पंचवीस लाख रुपयांचा आमदार निधीही बाजार समितीसाठी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच संचालकांचा सत्कार आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सुधीर राळेभात, उपसभापती कैलास वराट, संचालक अंकुशराव ढवळे, सतिश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय याचबरोबर सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, सुरेश भोसले, शिवाजी डोंगरे, दादा उगले, सरपंच हनुमंत पाटील, शरद शिंदे, सुरेश भोसले, भारत काकडे, भरत (बप्पा) काळे, त्रिंबक कुमकटकर, प्राचार्य युवराज मुरूमकर, कांतीलाल वराट, हरीभाऊ मुरूमकर, भरत लहाने, पोपट वराट, युवराज वराट, नानासाहेब लहाने, विष्णू लहाने, अशोक मुरूमकर, भाऊसाहेब लहाने, गजेंद्र वराट, भाऊसाहेब मुरूमकर, बबन तुपेरे, सुरेश पवार, महादेव वराट, विठ्ठल वराट, अजित वराट, बिभीषण वराट, युवराज चौभारे, अमोल गिरमे, राम जावळे, बापू वराट, गणेश सानप, पिंटूशेट बोरा, अशोक नेमाने यांच्या सह अनेक शेतकरी व्यापारी हमाल व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीत झाले ते झाले. आता सर्वाना विश्वासात घेऊन विकास कामे करा शेतकरी व्यापारी हमाल यांच्यासाठी काय काय करायचे याचे नियोजन करा. निधीची कसलीही अडचण येणार नाही.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत काय होणार हे मला माहीत आहे. त्याची कोणीही काळजी करू नये विरोधक फक्त २०२४ पर्यंत खुश राहणार आहेत.
आदर्श बाजार समिती करण्यासाठी काय काय करता येईल ते सर्व करा असा सल्ला उपसभापती व संचालक यांना दिला.
यावेळी बोलताना माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात म्हणाले की, शेतकरी केंद्र बिंदू मानून सर्व निर्णय घेण्यात येतील. कोणतीही गोष्ट चुकीची होऊ देणार नाही. शेतकरी व्यापारी हमाल यांना पुर्ण पणे संरक्षण देऊ कोणालाही त्रास होणार नाही.
यावेळी बोलताना उपसभापती कैलास वराट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संधीचे सोने करणार असे सांगितले.