जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार व राळेभात बंधुनी दिलेल्या संधीचे सोने करणार – उपसभापती कैलास वराट
उपसभापती पदग्रहण समारंभ संपन्न
एका सर्वसामान्य व्यक्तीला आमदार रोहित पवार व राळेभात बंधूनी संधी दिली आहे या संधीचे सोने करणार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना बरोबर घेत आमदार साहेबांचे विकासाचे व्हिजन पुर्ण करणारच असे उपसभापती कैलास वराट यांनी पदग्रहण समारंभात सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच संचालकांचा सत्कार आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सुधीर राळेभात, उपसभापती कैलास वराट, संचालक अंकुशराव ढवळे, सतिश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय याचबरोबर सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, शिवाजी डोंगरे, दादा उगले, सरपंच हनुमंत पाटील, शरद शिंदे, सुरेश भोसले, भारत काकडे, भरत (बप्पा) काळे, त्रिंबक कुमकटकर, प्राचार्य युवराज मुरूमकर, कांतीलाल वराट, हरीभाऊ मुरूमकर, भरत लहाने, पोपट वराट, युवराज वराट, नानासाहेब लहाने, विष्णू लहाने, अशोक मुरूमकर, भाऊसाहेब लहाने, गजेंद्र वराट, भाऊसाहेब मुरूमकर, बबन तुपेरे, सुरेश पवार, महादेव वराट, विठ्ठल वराट, अजित वराट, बिभीषण वराट, युवराज चौभारे, अमोल गिरमे, राम जावळे, बापू वराट, गणेश सानप, पिंटूशेट बोरा, अशोक नेमाने यांच्या सह अनेक शेतकरी व्यापारी हमाल व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसभापती कैलास वराट म्हणाले की, जामखेड बाजार समिती राज्यात आदर्श करण्यासाठी तसेच शेतकरी व्यापारी हमाल यांच्या सोईसाठी बाजार समितीत दवाखाना, स्वच्छ आरोचे पाणी, माल साठविण्यासाठी एयर हाऊस, शेतकरी व्यापारी हमाल यांच्यासाठी विश्रांतिका, स्वच्छता गृहे असे अनेक विकासाचे कामे करावयाचे आहेत. ही सर्व कामे विरोधकांना विश्वासात घेत करू असेही सांगितले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी बाजार समितीच्या विकासासाठी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये देण्याचे जाहीर केले. तर सुधीर राळेभात यांनी बाजार समितीत शेतकरी व्यापारी हमाल यांच्या हिताच्या निर्णयास पाठिंबा देऊ कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले.
दोन्ही आमदारात फरक