महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांचे निवड
ग्रामविकास अधिकारी युवराज पाटील याची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनाविरोध निवड झाली. यामुळे पाटील यांच्यावर राज्य, जिल्हा व तालुका स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर ची निवडणूक ंप्रक्रिया पार पडली. या निवडणुकी मध्ये जामखेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी श्री.युवराज (दादा) गोकुळ पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनाविरोध निवड झाली.
सदर निवडी प्रसंगी जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बांधवांचे त्यांना सहकार्य लाभले. या निवडी बद्दल सोलापूर येथील ग्रामसेवक संघटनेचे नेते श्री.लक्ष्मण तात्या गळगुंडे पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे , मा.प्रकाश पोळ गटविकास अधिकारी जामखेड यांनी त्यांचेअभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामधून आनंद व्यक्त होत आहे.