जामखेड न्युज——
ट्रान्सफार्मर न बसवल्यास महावितरणच्या उप अभियंता दालणात बायका मुलांसह ठिय्या आंदोलन करणार – प्रकाश काळे
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ट्रान्सफार्मर जाळल्यामुळे खडकवाडी येथील नागरिक, गुरे यांचे अतोनात हाल होत आहेत. महावितरणकडे वारंवार मागणी केली असता आज देऊ उद्या देऊ म्हणून चालढकल केली जात आहे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आज जर ट्रान्सफार्मर बसवला नाही तर उद्या मंगळवार दि. ३० रोजी बायका मुलांसह महावितरणच्या उप अभियंता दालणात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मागील आठ दिवसापासून खडकवाडी येथील ट्रान्सफार्मर जळालेला असून या संदर्भात महावितरण चे अधिकारी यांची भेट घेऊन हा विषय सांगितला असता त्यांनी खडकवाडी येथील रहिवाश्यांना २ ते ३ दिवसात ट्रान्सफार्मर बसून देतो असे सांगितले होते.
परंतु ८ दिवस झाले तरी महावितरण यांच्या कडून कुठलाही प्रतिसाद नाही. यामुळे खडकवाडी येथे गेल्या ८ दिवसा पासून लाईट नसल्या मुळे वयोवृद्ध नागरी, महिला, लहान मुले,यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तसेच त्यांचे लाईट नसल्या कारणाने पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे महावितरण कं यांनी २ दिवसात ट्रान्सफार्मरन नबसवल्यास मंगळवार
दि.३०/०५/२०२३ रोजी उपविभागीय अभियंता यांच्या दालनात ठिय्या अंदालोन करण्यात
येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर प्रकाश काळे, अनिल काळे, बाळू काळे, रोहित काळे, विशाल शेंडकर, शेख आदम, आशिष काळे, अक्षय जाधव, सागर जाधव, पंकज जाधव यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.