उद्या होणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदग्रहण समारंभ तसेच संचालकांचा सत्कार

0
137

जामखेड न्युज——

उद्या होणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पदग्रहण समारंभ तसेच संचालकांचा सत्कार

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार समारंभ उद्या मंगळवार दि ३० रोजी सकाळी दहा वाजता आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे तेव्हा कार्यक्रमासाठी शेतकरी, व्यापारी व हमाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपसभापती कैलास वराट यांनी केले आहे.


आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास पॅनलचे नवनिर्वाचित उपसभापती
कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच संचालकांना सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रोहित पवार असतील तर प्रमुख उपस्थिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात हे असतील. तरी कार्यक्रमासाठी शेतकरी, व्यापारी, हमाल यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या मंगळवार दि. ३० रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच नवनिर्वाचित संचालक सुधीर राळेभात, अंकुशराव ढवळे, सतिश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वानी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे उपसभापती यांनी आवाहन केले आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी पँनलला 9 तर आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला 9 जागा मिळाल्या होत्या सभापती व उपसभापती निवडी ईश्वर चिठ्ठीद्वारे झाल्या यात सभापती आमदार प्रा. राम शिंदे गटाचे शरद कार्ले तर उपसभापती आमदार रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची चिठ्ठी निघाली होती मागील सोमवारी सभापती पदग्रहण समारंभ झाला उद्या उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण व संचालक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती उपसभापती कैलास वराट यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here