भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल; नवनाथ पडळकर यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती, तसेच अहमदनगर शहर भाजपा जिल्हा प्रभारी विशेष जबाबदारी

0
205

जामखेड न्युज——

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल; नवनाथ पडळकर यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती,

तसेच अहमदनगर शहर भाजपा जिल्हा प्रभारी विशेष जबाबदारी

 

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून त्यात बारामतीचे नवनाथ पडळकर यांची प्रदेश सचिव पदावर नियुक्ती केली आहे.अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ३८ प्रमुख चेहरे प्रदेश कार्यकारणी मध्ये देत असताना जुन्या चेहऱ्यांना बाजूला करत नव्या दमाची टीम तयार केली आहे.

नवनाथ पडळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या ‘नगर शहर जिल्हा प्रभारी’ पदी विशेष जबाबदारी देऊन पक्षाने नवीनच खेळी केली आहे. विखे पिता-पुत्र आणि राम शिंदे यांच्यातील विस्तव जाता जाईना. त्यामुळे बारामती लोकसभा क्षेत्रातील कट्टर पवार विरोधक नवनाथ पडळकर यांची प्रभारी पदी नियुक्ती केल्याने विखे- शिंदे गटामध्ये समन्वय साधण्याचं आव्हान पडळकर यांना पेलावे लागणार आहे.


भाजपच्या ‘फादर बॉडी’ अर्थात मुख्य संघटनेत पुणे ग्रामीण मधून पडळकर यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. पडळकर हे ‘वंचित’ चे प्रदेश महासचिव होते व बारामती लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात.

पक्ष संघटनेतील हे सर्व बदल पाहता भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा, विधान सभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here