जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन शासकीय योजनांची माहिती व समस्या निराकरणासाठी शिबीर महत्त्वाचे

0
237

जामखेड न्युज——

जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन

शासकीय योजनांची माहिती व समस्या निराकरणासाठी शिबीर महत्त्वाचे

 

शासकीय विभाग प्रमुखांच्या उपस्थिती जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवार दि. ३० मे रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आणि तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने सदर शिबिर संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष तहसीलदार योगेश चंद्रे व सचिव बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी केले आहे.

जामखेड मधील पंचायत समिती सभागृहात विविध प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत दिनांक 30 मे रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आणि तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने सदर शिबिर संपन्न होणार आहे.


शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून स्री शक्ती समाधान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरात तालुकास्तरावरील सर्व कार्यालय तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा, महावितरण, बचत गट, शिक्षण विभाग, तालुका विधी सेवा प्राधिकरण, समाज कल्याण, पशुसंवर्धन यांचा सहभाग राहणार आहे.


कोणत्याही विभागाशी संबंधित समस्या असेल तर महिलांनी ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद कार्यालयातून अर्ज घेऊन विहित नमुन्यात अर्ज भरून ग्रामपंचायत किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास जमा करावेत .जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती अध्यक्ष तथा तहसीलदार श्री .योगेश चंद्रे व सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here