जामखेड शहरात महावितरणचा भोंगळ कारभार मुख्य वीजवाहीनीला चिटकून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

0
193

जामखेड न्युज——

जामखेड शहरात महावितरणचा भोंगळ कारभार मुख्य वीजवाहीनीला चिटकून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

 

जामखेड शहरातील जुन्या डी. जे हॉटेलच्या पाठीमागील भागात एका नऊ वर्षाच्या मुलीचा घरावरुन गेलेल्या मुख्य वीजवाहीनीच्या तारेला चिटकून मुत्यू झाला. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या ठीकाणी अरुंद आसलेल्या रस्त्यावरुन गेलेली मुख्य वीजवाहीनी ही शहरा बाहेरुन घेण्यात यावी अशी मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड शहरातील जुन्या डी. जे हॉटेलच्या पाठीमागील भागात रहाणार्‍या नागरिकांच्या घरावरुन भुतवडा रोडकडे मेनलाईन गेलेली आहे. याच भागात काल दि 26 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओमी म्हैसकर, वय. ९ वर्षे. रा.वरकुटे. ता. करमाळा. जिल्हा सोलापूर ही नऊ वर्षाची मुलगी घराच्या स्लँपवर खेळत होती. या वेळी अचानक तिला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईन च्या तारेचा धक्का बसला तशी ती मुलगी स्लँपवरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती.

यानंतर ही घटना शेजारी राहणारे संतोष घोलप व राहुल पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सदर मुलीस गाडीवरुन शहरातील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओमी म्हैसकर ही मुलगी सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यातील वरकुटे गावची रहीवासी आहे. ती कालच जामखेड येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नानिमित्त आपल्या आईसोबत आली होती. मात्र या लाईटच्या मेनलाईन मुळे तिचा मृत्यू झाला असल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती समजताच घटना घडली त्या ठिकाणी जामखेड महावितरण विभागाचे अधिकारी योगेश कासलीवाल यांनी भेट दिली. तसेच मयत मुलीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करु आसे सांगितले. जामखेड शहरातुन गेलेल्या सर्व मुख्य वीजवाहीनीला नविन प्लास्टिक कोटेड केबल टाळण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळताच या ठीकाणी आसलेल्या तारा बदलण्यात येतील आशी माहिती दिली.

डी. जे. हॉटेल च्या पाठीमागून भुतवडा रस्त्याने मोठी वाहनांची वर्दळ असते. आनेक वेळा या रस्त्यावर मेनलाईनच्या तारा तुटुन दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे घटना घडली या ठिकाणाहुन गेलेली मेनलाईन काढुन दुसर्‍या मार्गाने टाकण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

चौकट

विजेचा करंट बसलेली मुलगी एका खासगी दवाखान्यात आणलेली असताना तिला मृत घोषित केले याचदरम्यान साकत येथील दोन वर्षांच्या आर्यन आण्णा अडसूळ हा मुलगा दिवसभर खेळत असताना अचानक त्रास झाल्याने दवाखान्यात आणले होते पण तोपर्यंत त्याचाही मृत्यू झाला होता. मुलीचा करंट बसून तर मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here