जामखेड न्युज——
जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये एकाच रूग्णांवर दुर्बिणीद्वारे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया
सवलतीच्या दरात यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न, हाँस्पीटलच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमादारवाडी येथील महिला रूग्णाला पित्ताशयातील पिशवीत खडे, तसेच पुर्वीच्या पिशवीच्या शस्त्रक्रियेमुळे हर्निया, तसेच आतड्याची गुंतागुंत असे तीन आजार होते.
यानुसार जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी औरंगाबाद येथील प्रसिद्ध पोटविकार तंज्ञ डॉ. मुकेश राठोड यांच्याशी संपर्क करून त्यांचे मार्गदर्शनाखाली तिन्ही आँपरेशन करण्याचे ठरले यानुसार तिन्ही आँपरेशन सवलतीच्या दरात यशस्वी झाले.
तिन्ही आँपरेशन साठी मोठ्या भुलीची गरज होती यासाठी प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. अंकुश पवार व डॉ. प्रिया टेकाडे यांना बोलावले. आणि तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.
अंत्यत गुंतागुंतीच्या तिन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी यशस्वी संपन्न झाल्यामुळे जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ सचिन टेकाडे व डॉ सरफराज खान यांनी डॉ मुकेश राठोड यांचा सत्कार केला.
सामाजिक बांधिलकीतुन महिनाभर जामखेड सर्जिकल अँड अँक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात मोठ मोठ्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. याचा फायदा अनेक गोरगरीब रूग्णांना होत आहे. यामुळे हाँस्पीटलच्या टिमचे सर्वत्र कौतुक होत आहे.