Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरणाच्या बीलासाठी शेतकरी करणार उपोषण

शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरणाच्या बीलासाठी शेतकरी करणार उपोषण

0
261

जामखेड न्युज——

शेततळे व प्लास्टिक अस्तरीकरणाच्या बीलासाठी शेतकरी करणार उपोषण

कृषी विभागाच्या नियमानुसार शेततळे केले प्लास्टिक कागद अस्तरीकरण केले तरीही दोन वर्षापासून बील मिळाले नाही तर काही शेतकऱ्यांना कागद न टाकताही पैसे मिळाले आहेत हे काय चालले आहे. पंधरा दिवसांत जर बील मिळाले नाही तर बील न मिळालेले शेतकरी पाच जून रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती बीलापासून वंचित शेतकरी राम मुरूमकर यांनी सांगितले.

कृषी खात्याच्या आदेशानुसार २०२१-२२ मध्ये जामखेड तालुक्यात ३३२ शेततळे झाले याचे अस्तरीकरण कागदपत्रे, बील आँनलाईन दाखल केले पण फक्त २४ शेततळे अस्तरीकरण बील मिळाले हे कोणत्या निकषांवर मिळाले आणी ३०८ कोणत्या निकषांवर नाकारले यांची माहिती मिळावी अशी मागणी साकत येथील शेतकरी राम मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे कृषी विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने चुकीची माहिती दिली आहे. 

उपरोक्त विषयान्वे मी आपणास कळवू इच्छितो कि,
दि.१/०३/२०२३ रोजी आपणास मी एक अर्ज केला होता सदर अर्जा नुसार आपण मला सविस्तर समाधान कारक माहिती दिलेली नाही. त्यानंतर मी दि. २७/०३/२०२३ रोजी शेततळे अस्तरी करण संदर्भीय अर्ज केला सदर अर्जा नुसार आपल्या ऑफिसने मला ३३२ लाभार्थीची यादी दिली. सदर यादी मध्ये ३३२ पैकी फक्त २४ लाभार्थीना पैसे मिळालेले आहेत.

तसेच सदर यादी मध्ये असे दिसून आले. श्री गर्जे अशोक साहेबराव यांना खोद कामाचे पैसे मिळालेले नाहीत. परंतु कागदाचे पैसे मिळलेले आहेत . तसेच श्री. रतन भीमराव पाटील गट नं. ९७४ मध्ये त्यांना काम झालेले नसताना पेमेंट मिळलेले आहे. याची सविस्तर माहिती आपण दिलेली नाही. सदर ३३२ लाभार्थी पैकी फक्त २४ लाभार्थीना पेमेंट कोणत्या निकषावर दिले गेले व बाकीच्यांना का नाकारण्यात आले याची माहिती आपण दिलेली नाही. सदर तक्रार कामी आम्ही सर्व पेमेंट न मिळालेली लाभार्थी मा. तहसिदर साहेब जामखेड यांच्या कार्यालया समोर दि.०५/ ०६/ २०२३ रोजी सकाळी ११. वा अमरण उपोषण करणार आहोत याची आपणास या अर्जाद्वारेविनंती करत आहेत. सदर माहिती देताना आपणा २०२ शेत तळ्याची माहिती दिली गेली सदर माहिती मात्र प्रत्यक्षात ३३२ लाभार्थीची यादी आहे. अशी चुकीची माहिती दिली गेली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!