जामखेड न्युज——
नगर जिल्हा बाजार समिती कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी सागर राळेभात यांची बिनविरोध निवड
अहमदनगर जिल्हा बाजार समिती कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडचे सागर राळेभात पाटील यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचारी पतसंस्थेचे १५ संचालक मंडळ आहेत जिल्ह्यातील उत्तरेकडील अकोले, संगमनेर, राहुरी या तालुक्यांची वेगळी पतसंस्था आहे.
अहमदनगर जिल्हा बाजार समिती कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडचे श्री सागर राळेभात पाटील यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शरदरावजी कार्ले, उपसभापती कैलास (सर) वराट, सर्व संचालक मंडळ तसेच बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद, लेखापाल अशोकराव मुळे व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या वेळेस वाहेद सय्यद हे बिनविरोध संचालक होते त्या अगोदरच्या पंचवार्षिक निवडणुकीत अशोक मुळे जिल्ह्यात दोन नंबरचे मताधिक्ये घेऊन निवडून आले होते. आणी आता सागर राळेभात बिनविरोध संचालक झाले आहेत.