विधानपरिषद सदस्यत्वाचे 100 दिवस पूर्ण सत्यजीत तांबेंचा सोशल मीडियाद्वारे जनसंवाद कामाचा नियमित अहवाल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेबसाईटचे लोकार्पण

0
185

जामखेड न्युज—–

विधानपरिषद सदस्यत्वाचे 100 दिवस पूर्ण

सत्यजीत तांबेंचा सोशल मीडियाद्वारे जनसंवाद

कामाचा नियमित अहवाल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेबसाईटचे लोकार्पण

 


आमदार सत्यजीत तांबे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांच्या काळात सत्यजीत तांबे यांनी झपाट्याने कामे केली असून या कामांची माहिती देण्यासाठी एका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले आहे. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाला 100 दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधत त्यांच्या सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. या जनसंवादादरम्यान त्यांनी वेबसाईटबद्दलची माहिती दिली. या वेबसाईटची वैशिष्ट्ये आणि तपशील काय आहे हे देखील त्यांनी जनसंवादादरम्यान सांगितले.

या वेबसाईटद्वारे सत्यजीत तांबे यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला आहे. तांबे यांनी सुरू केलेल्या विविध योजना आणि उपक्रमांचीही या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे.

“आपल्याला जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिले असून त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ते आनंदी असावेत यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. या वेबसाईटद्वारे माझ्या कार्यकाळात कोणकोणते बदल घडत गेले हे जनतेला कळेल. येत्या काळात बऱ्याच गोष्टी करायच्या असून यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे,” असे तांबे यांनी म्हटले.

ही वेबसाईट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असून यामध्ये सत्यजीत तांबे यांनी राबविलेल्या उपक्रमांची सखोल तपशीलासह माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाईटचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रियाही देता येणार आहेत. या प्रतिक्रियांद्वारे नागरीक त्यांची सत्यजीत तांबेंबाबतची मते मांडू शकतील तसेच गरज असल्यास सूचना किंवा समस्याही मांडू शकतील. जनसामानान्यांना भेडसावणाऱ्या या सूचना, समस्यांची तत्काळ दखल घेतली जाणार असून त्यावर योग्य त्या उपाययोजनाही केल्या जातील. वेबसाईटवर सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ईमेल आयडी तसेच त्यांच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. याद्वारे देखील नागरीक आपल्या समस्या मांडू शकतील.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यांत विभागला गेला आहे. यामध्ये एकूण ५४ तालुके व ४००० गावांचा समावेश आहे. भला मोठा विस्तार असलेल्या या मतदारसंघात निवडून आल्यापासून मुंबई व संगमनेरचा मुक्काम सोडला तर सत्यजीत तांबे हे दररोज सरासरी ५००- ६०० किमीचा प्रवास करतात. निवडणुकीत मतदारांनी आणि सर्वसामान्य जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी गेला महिनाभर मतदारसंघात आभार दौरे आयोजित केले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना शेकडो लोकं भेटत असून ती तांबे यांच्याकडे विविध समस्या घेऊन येत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघात लोकोपयोगी कामे व्हावीत यासाठी निधी मिळावा यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत.उदाहरण द्यायचं झालं तर अहमदनगर शहराच्या प्रोफेसर कॉलनी येथील बंद अवस्थेत असलेले स्पर्धा परीक्षा केंद्राचे देता येईल. हे केंद्र पुनर्जिवीत करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी ५५ लाख रुपयांचा भरीव निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. यामुळे जिल्ह्यातील अनेक होतकरू उमेदवारांचे सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहेत.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार नगरपालिकेला शासनाकडून मिळालेल्या निधीतून आधुनिक वाचनालयाच्या बांधकामासाठी व उत्कृष्ट दर्जाच्या पुस्तकांसाठी २० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील महानगरपालीका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यपद्धती नियमावली संदर्भातदेखील आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यानुसार राज्यातील सहा महापालिकांच्या नियमावली शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले.

सत्यजीत तांबे यांनी अत्याधुनिक ग्रंथालयाच्या बांधकामासाठी आणि दर्जेदार पुस्तकांसाठी सरकारकडे पाठपुरावा करून 20 लाख रुपये मंजूर करून घेतले. यासोबतच, त्यांनी ‘युवा माहिती केंद्र’ स्थापन करण्यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला आणि भरीव निधी मंजूर करून घेतला. शासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक पदवीधर मतदारसंघातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये युवा माहिती केंद्रे सुरू करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी लवकरच हे युवा माहिती केंद्र सुरू होणार आहे. या माहिती केंद्रांमध्ये युवकांना नोकरी, शिक्षण, उच्च शिक्षण अशा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींबाबत विविध पर्याय तसेच संधी उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here