जामखेड न्युज——
रस्त्याच्या प्रश्नावर राजकारण करून राजकीय पोळी भाजू नये – आमदार रोहित पवार
मंत्री असताना रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही
याचे आत्मपरीक्षण करावेरस्त्याच्या कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गेली अनेक वर्षापासून भाजपचे आमदार सदाशिव लोखंडे आमदार राम शिंदे व ते मंत्री असताना सुद्धा खर्डा वाकी रस्त्याला मंजुरी दिली नाही, अनेक वेळा शेतकऱ्यांनी निविदेने दिली होती. परुंतू हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खर्डा येथे येऊन गारपिटीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या आदेश दिले त्याचाही एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही, विरोधकांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावयास हवा पण फक्त राजकारण करण्याचे काम करू नये असा इशारा आमदार रोहित पवार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
याबाबत माहिती अशी की खर्डा ते जुना वाकी रस्त्याच्या प्रश्न गेली 25 ते 30 वर्षापासून प्रलंबित आहे या भागातील शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याचा व दळणवळणाचा प्रश्न अनेक वेळा यापूर्वीच्या आमदार, खासदार यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते परंतु सर्वांनी या रस्त्यावर शाश्वत असा निधी उपलब्ध केला नाही नंतर या रस्त्याच्या प्रश्नासाठी या भागातील शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना यापूर्वी ही निवेदन दिले होते, आमदार पवार यांनी समक्ष या रस्त्याला भेट दिली होती त्यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते, परंतु अद्याप पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी दिनांक 19 मे रोजी खर्डा येथे आमदार रोहित पवार हे आले असता त्यांच्या गाडीसमोर शेतकरी बसल्याने व ते लोक त्यांच्या जवळ येऊन चर्चा न केल्याने त्यांना अचानक काय प्रकार आहे हे समजले नाही, ते शेतकऱ्यांशी चर्चां न करता निघून गेले,त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते, याचा राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करून राजकीय आरोप केले होते.
नंतर आमदार रोहित पवारांनी पुन्हा खर्डा येथे येऊन सदर सर्व शेतकऱ्यांबरोबर सविस्तर खेळी मेळीच्या वातावरणात चर्चा करून खर्डा – वाकी रस्त्यासाठी 25 लाख रुपये जिल्हा नियोजन मधून मंजूर करून पुढील रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी येथील शेतकऱ्यांना दिले तसेच तुम्ही माझेच कार्यकर्ते आहेत, तुमचा माझ्यावर कामाच्या संदर्भात अधिकार आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कोणतीच नाराजी नाही आपले प्रलंबित असणारे काम करणे हे माझे कर्तव्यच समजतो असे त्यांनी सांगितले, अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.
यावेळी खर्डा सेवा सोसायटीचे चेअरमन मुकुंद अप्पा गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन उद्धव ढेरे, विजयसिंह गोलेकर,दत्तात्रय भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य एजाज दादा जिकरे, भाऊ ढेरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर इत्यादी सह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.