साकत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद मुरुमकर यांच्यातर्फे आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची मदत

0
265

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
 कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मधुन आतापर्यंत जवळपास सहा हजार कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत तेही अगदी मोफत यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले होते यानुसार आरोळे कोविड सेंटरला अनेक ठिकाणाहून अन्नधान्य, भाजीपाला व रोख रक्कमेच्या स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. साकत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष व सध्या ऐरोली नवीमुंबईत प्लंबिंग काॅन्ट्रॅक्टर असलेल्या प्रमोद मुरुमकर यांनी आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची मदत केली आहे.
        प्रमोद मुरुमकर हे साकत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. ते सध्या ऐरोली नवी मुंबईत प्लंबिंग काॅन्ट्रॅक्टर आहेत. आरोळे कोविड सेंटरच्या सामाजिक कार्याबद्दल ते बातमीच्या माध्यमातून व सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऐकुन होते. आपणही काही तरी मदत केली पाहिजे असे वाटत होते. तेव्हा त्यांनी आरोळे कोविड सेंटरचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते नंबर घेतला व नवीमुंबईहून आरोळे कोविड सेंटरला एक्कावन्न हजार रुपयांची रक्कम पाठवली प्रमोद मुरुमकर यांच्या मदतीबद्दल आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व असिफ पठाण यांनी मुरुमकर यांचे आभार मानले आहेत.
                   
    मुरुमकर हे गावात आल्यावर गावाच्या विकासासाठी ते नेहमीच सकारात्मक विचार करून गावाचा सर्वागीण विकास कसा करता यासाठी गावातील पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आसतात. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी शौचालये याबाबत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून गावाचा सर्वागीण विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत आसतात. परिसरातील अनेक गोरगरीब सर्व सामान्य नागरीकांना ते नेहमीच काही ना काही मदत करत आसतात. आरोळे कोविड सेंटरचे कार्य वर्तमानपत्रातील बातम्या व सोशल मिडीयावरून माहिती कळली व मदतीसाठी पुढे आले व आरोळे कोविड सेंटरचा अकाउंट नंबर घेऊन आज एक्कावन्न हजार रुपयांची मदत केली आहे. या मदतीमुळे प्रमोद मुरुमकर यांच्या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here