जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोनाच्या दुस-या लसीचा डोस घेणे अत्यंत गरजेचे असताना, लसीचा अपुरा पुरवठा लोकांचा जीवघेणा ठरणार आहे. दुसरा डोस घेण्यासाठी लोकांची दिवसेंदिवस येथील ग्रामीण रूग्णालयासमोर होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे. अशातच लस घेण्यासाठी केवळ जामखेड तालुक्यातीलच नव्हे तर आॅनलाईन मुळे बाहेरील जिल्हा व तालुक्यातीलही लोक याठिकाणी येत असल्याने ग्रामीण रूग्णालय प्रशासनावर याचा अतिरिक्त ताण पडला आहे.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालय कोरोना संसर्गाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. तालुक्यातील जनता मात्र कोरोना लसीपासून वंचीत राहत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला प्राधान्याने कोरोना लस द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.
कोठारी म्हणाले, ज्यांचे पहिला डोस घेवुन बेचाळीस दिवस झाले आहेत , त्या लोकांना दुसरी लस मिळेल की नाही. या चिंतेत पडले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना ऑनलाइन आदेश देण्यात आले परंतु, जामखेड याठिकाणी पुणे,नगर ,कडा,आष्टी ,बीड ,पाटोदा ,शिर्डी, पाथर्डी यासह अनेक ठिकाणच्या लोकांनी जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात नाव नोंदवले आहे. त्यामुळे जामखेडकर या लसीपासून वंचित राहिले आहेत. याप्रश्री प्रशासनाने ज्या त्या विभागातील ज्या त्या लोकांना येतीलच ग्रामीण रुग्णालयात घेण्यास परवानगी द्यावी तसेच २०० जाणांना लस देण्यात येणार असल्याचे समजले परंतु त्यामध्ये सत्तर-ऐंशी बाहेरचे लोकांचे नाव आहेत.त्यामुळे येथील लोकांच्या लसीकरणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांनी सांगितले.

सकाळी सात वाजल्यापासून कोरोना लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सोशल डिस्टींगशनचा फज्जा उडालेला दिसतो. आॅनलाईन नोंदणी करताना मोठी अडचण येत आहे. नाव नोंदणी होत नाही. केंद्र वेळ दाखवत नाही. त्यामुळे खुपच गर्दी होत आहे. या ठिकाणाहून कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन तालुक्यातील लोकाना प्राधान्याने लस द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.