जामखेड बाजार समिती सभापती निवड 16 तारखेला दोन्ही गटाला 9 – 9 जागा, कोण होणार सभापती उत्सुकता शिगेला

0
264

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समिती सभापती निवड 16 तारखेला

दोन्ही गटाला 9 – 9 जागा, कोण होणार सभापती उत्सुकता शिगेला

कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या आहेत. सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे.


आमदार रोहित पवार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी विकास पँनलला 9 जागा मिळाल्या आहेत.

1) सुधीर राळेभात
2) कैलास वराट
3) अंकुश ढवळे
4) सतिश शिंदे
5) रतन चव्हाण
6) अनिता शिंदे
7) नारायण जायभाय
8) राहुल बेदमूथा
9) सुरेश पवार


तर आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पँनलने 9 जागा मिळाल्या आहेत.

1) गौतम उतेकर
2) सचिन घुमरे
3) विश्वनु भोंडवे
4) गणेश जगताप
5)शरद कार्ले
6) वैजीनाथ पाटील
7) नंदकुमार गोरे
8)सिताराम ससाणे
9)रविंद्र हुलगुंडे

9 – 9 जागा मिळाल्या मुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही पँनल प्रमुख आपापले विजयी उमेदवार सहलीसाठी घेऊन गेले आहेत. आता 16 मे तारीख फायनल झाली आहे तेव्हा सहलीसाठी गेलेले सभासद 16 तारखेला जामखेड मध्ये दाखल होतील.

यातील एका जरी सदस्यांने जरी गुप्त मतदानाची मागणी केली तरी गुप्त मतदान होणार अन्यथा हात उंचावून घेऊ शकतात.

गुप्त मतदानात जर समसमान मते मिळाली तर पुन्हा ईश्वर चिट्टी द्वारे सभापती निवड होणार. यामुळे जामखेड वाशियांना कोण होणार सभापती याची मोठी उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here