Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू अनेक कार्यक्रमात सर्रास आवाजाचे उल्लंघन

श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू अनेक कार्यक्रमात सर्रास आवाजाचे उल्लंघन

0
319

जामखेड न्युज——

श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू

अनेक कार्यक्रमात सर्रास आवाजाचे उल्लंघन

 

मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) यांना डीजेच्या आवाजाने खुपच त्रास झाला आणि उपचारादरम्यान काल शनिवारी प्राणज्योत मालवली.


श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

खंडागळे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात गेले होते. तेथे मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्याचा त्यांना त्रास झाला.


श्रीगोंदा येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!