जामखेड न्युज——–
समर्थ हाँस्पिटलचे कार्य उल्लेखनीय – पोलीस निरीक्षक महेश पाटील
वर्धापनदिनानिमित्त गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप
शिबिरात 157 गरजू रुग्णांना लाभ
समर्थ हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जामखेड येथील डॉक्टर भरत दारकुंडे यांनी मोफत महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात १५७ गरजू रूग्णांनी लाभ घेतला सर्वांना तपासून आरोग्या विषयी माहिती डॉक्टर अमोल भगत एमडी मेडिसिन यांनी शेतकरी गोरगरीब अशा लोकांना व्यवस्थित तपासून माहिती दिली यावेळी सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित श्री साकेश्वर गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले मी आता नवीन आलो आहे हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन यांचे जवळचे नाते असते कारण काय घटना घडल्या तर पोलीस स्टेशनमध्ये एमएलसी साठी येत असतात बऱ्याच एम एल सी ह्या समर्थ हॉस्पिटलच्या दिसल्या म्हणून मी समक्ष येऊन पाहणी केली मला खूप समाधान वाटले डॉक्टर भरत दारकुंडे हे रुग्णांना अल्प दरात सेवा देतात हे मी रुग्णांकडून माहिती घेतली मला फार समाधान वाटले
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले मी गेली सात वर्षापासून डॉक्टर भरत दारकुंडे यांना ओळखत आहे जामखेड शहरांमध्ये कोरोना काळामध्ये पहिलं कोरोना सेंटर डॉक्टरांनी चालू केले आणि गोरगरिबांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता तसेच आता पण आम्ही नेहमी पेशंट आणतो कोणाकडे पैसे आसो- नसो डॉक्टर त्यांना मदत करतात आज नवीन त्यांनी उपक्रम केला असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गौशाळेतील ७० गायांना दोन दिवस पुरेल एवढा चारा दिला तसेच रुग्णांना आजपासून मोफत जेवण देण्याची सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे डॉक्टरांची अशीच प्रगती होऊन गोरगरिबांना सहकार्य करून अशी भावना व्यक्त करतो
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तर कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते झाले यावेळी लहू शिंदे, सागर सदाफुले, अमोल शिंदे, निलेश माने, किरण अंधारे, उमेश ढगे, गणेश उबाळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, लियाकत शेख, अविनाश बोधले, किरण रेडे, पांडूराजे भोसले, उमेश राळेभात, अभिजीत राळेभात, उत्कर्ष कुलकर्णी, गणेश जोशी, मयूर भोसले, भाऊ पोटफोडे आदी उपस्थित होते,
या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,ई. सी. जी. तपासणी, दमा अस्थमा पेशंट साठी ( PFT) फुफुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारासाठी एक्स-रे, मधुमेह (शुगर)च्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी या सर्व तपासण्या मोफत करणार आहेत तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले आहे
तसेच प्रथम वर्धापन दिवसानिमित्ताने हॉस्पिटल मधील रुग्णांना रोज मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता झाले असून या शिबिरात डॉक्टर अमोल भगत एम.डी. मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ञ, डॉक्टर आशा भगत एम.बी.बी.एस. डी.जी. ओ.स्री रोग तज्ञ, डॉक्टर अर्जुन शेळके अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर भरत दारकुंडे संचालक, डॉक्टर सोनाली दारकुंडे संचालक समर्थ हॉस्पिटल जामखेड हे तपासणार आहेत
३ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर ६ वाजेपर्यंत सर्व रुग्णांना तपासले आहे
माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे यांनी दिली