जामखेड बाजार समितीत युवा नेते अमोल राळेभात व प्रा. सचिन गायवळ यांचाच करिश्मा दोन्ही गटाला समसमान 9 – 9 जागा

0
207

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समितीत युवा नेते अमोल राळेभात व प्रा. सचिन गायवळ यांचाच करिश्मा

दोन्ही गटाला समसमान 9 – 9 जागा

कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या आहेत. या निकालाचा सारासार विचार करता अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ या दोन नेत्यांचा करिश्मा दिसून आला आहे.

सेवा संस्था मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचे तर ग्रामपंचायत मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांचा करिश्मा दिसून आला हे निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे.

आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात हे होते. राळेभात यांच्या सुयोग्य नियोजनामुळे सेवा संस्था मतदारसंघात अकरा जागेपैकी सात जागा जिंकल्या आहेत. ते
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
सुधीर राळेभात 360
कैलास वराट 278
अंकुश ढवळे 265
सतिश शिंदे 261
रतन चव्हाण 319
अनिता शिंदे 314
नारायण जायभाय 314

तर भाजपाला चार जागा मिळाल्या विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.

गौतम उतेकर 269
सचिन घुमरे 335
विश्वनु भोंडवे 270
गणेश जगताप 325

वरील निकाल पाहता अमोल राळेभात यांचा सेवा संस्था मतदारसंघात करिश्मा दिसून आला आहे.

तर ग्रामपंचायत मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांचा करिश्मा दिसून आला त्याच्या मुळे चार पैकी चार जागा भाजपाला जिकंता आल्या विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

शरद कार्ले – 313
वैजीनाथ पाटील 266
नंदकुमार गोरे 288
सिताराम ससाणे 243

वरील सेवा संस्था मतदारसंघात अमोल राळेभात तर ग्रामपंचायत मतदारसंघात प्रा. सचिन गायवळ यांचाच करिश्मा दिसून आला आहे.

तर व्यापारी मतदारसंघात दोन्ही जागा आमदार रोहित पवार यांच्या गटाला मिळाल्या आहेत
राहुल बेदमूथा 192
सुरेश पवार 214

तर हमाल मापाडी मतदारसंघात भाजपाचे रविंद्र हुलगुंडे – 133 मते घेत विजयी झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here