जामखेड न्युज——
कर्जतकरांचा कौल आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांना समसमान
दोन्ही गटाला 9 – 9 जागा
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार आणि आ राम शिंदे या दोघांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पहावयास मिळाला. आज जाहीर झालेल्या 18 जागांमध्ये आमदार राम शिंदे यांच्या भाजप व शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांना नऊ जागा व आमदार रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला नऊ जागा मिळाल्या.
या 18 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सात जागा काँग्रेस दोन जागा भारतीय जनता पक्ष सात जागा शिवसेना ठाकरे गट एक जागा शिवसेना शिंदे गट एक जागा याप्रमाणे मिळाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले उद्या होते. बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते सत्ता राखणार की आमदार रोहित पवार परिवर्तन घडवणार याविषयी मुख्य उत्सुकता निर्माण झाली होती.
सकाळी नऊ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये भाग्यतारा मंगल कार्यालय या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीसाठी एकूण दहा टेबल होते. सुरुवातीला सेवा सहकारी संस्थेची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याची दिसून आले . आणि याचा मोठा फटका आमदार राम शिंदे यांच्या पॅनलला बसला. यामुळे मतमोजणीसाठी आणि निकाल जाहीर झाल्या करण्यासाठी देखील मोठा विलंब लागला. सेवा संस्थेच्या महिला व इतर जागांची मतमोजणी पाठीमागून सुरू करू नये त्याचा निकाल जाहीर झाला मात्र सर्वसाधारण जागांचा निकाल क्रॉस ओटींगमुळे बराच वेळ रखडला. तोपर्यंत निकालाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांना प्रत्येकी एक जागा मिळाली . नंतर सर्वसाधारण सात जागांचा निकाल जाहीर झाला यामध्ये पाच जागा राम शिंदे यांच्या गटाला व रोहित पवार यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीत मतदार संघामध्ये चार पैकी तीन जागा रोहित पवार यांच्या गटाला मिळाल्या तर एक जागा राम शिंदे यांच्या गटाला मिळाली शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव हे विजयी झाले. यावेळी निकालाचा खरा टेन्स निर्माण झाला. राम शिंदे यांच्या गटाला आठ तर रोहित पवार यांच्या गटाला सात जागा झाल्या. उर्वरित तीन जागा कोणाला मिळणार यावरच सत्ता कोणाकडे हे ठरणार होते. हमाल मापारी मतदारसंघांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाची बापूसाहेब नेटके हे विजयी झाले.
व्यापारी मतदारसंघांमध्ये दोन जागा रोहित पवार यांच्या गटाकडे गेल्या, यामुळे दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्या. व्यापारी मतदारसंघाची फेर मतमोजणी झाली मात्र त्यात काही बदल झाला नाही यानंतर सेवा संस्थेच्या दोन जागांसाठी मोजणीची मागणी करण्यात आली मात्र निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांनी ही मागणी फेटाळली.
निवडणूक निकाल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आणि मित्र पक्ष या सर्वांनीच सर्वसाधारण जल्लोष केला आणि कार्यकर्ते कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे माघारी परत गेले.
विजय उमेदवार सेवा संस्था
अभय पाटील 566 मते, मंगेश जगताप 502, गुलाब तनपुरे 459 काकासाहेब तापकीर 527 नंदाराम नवले 459 रामदास मांडगे 460 संग्राम पाटील 460
सुवर्णा कळसकर 478 विजया गांगर्डे 515 श्री हर्ष कैलास शेवाळे 495 लहू वतारे 486,राम कानगुडे 463 बळीराम यादव 376, वसंत कांबळे 435 अमोल पाटील 434, प्रफुल्ल नेवसे 315 विजय भंडारी 215 व बापूसाहेब नेटके 158