सहकार व शेतकरी विकास पॅनलमध्ये अभ्यासू व जनहिताला प्राधान्य देणारे उमेदवार असल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा कोणी कितीही गप्पा मारल्या तरी बाजी सहकार व शेतकरी विकास पँनलच मारणार

0
126

जामखेड न्युज——

सहकार व शेतकरी विकास पॅनलमध्ये अभ्यासू व जनहिताला प्राधान्य देणारे उमेदवार असल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा

कोणी कितीही गप्पा मारल्या तरी बाजी सहकार व शेतकरी विकास पँनलच मारणार

 

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी
आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सहकार व शेतकरी विकास पॅनल तयार झाला असून या पँनलमध्ये अभ्यासू, अनुभवी, शेतकऱ्यांना न्याय देणारे उमेदवार दिले आहेत. यामुळे जनतेच्या मनातील पँनल अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात केला आहे. मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. कोणी कितीही गप्पा मारल्या तरी बाजार समितीवर आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास पँनलचीच सत्ता येणार असा विश्वास जामखेड न्युजशी बोलताना उमेदवारांनी केला.

सहकार व शेतकरी विकास पँनलमध्ये सुधीर राळेभात, महादेव डुचे, अंकुशराव ढवळे, सतिष ढगे, कैलास वराट, शहाजी पवार, सतिश शिंदे, शिवाजी भोसले रतन चव्हाण, हनुमंत पाटील, शरद शिंदे, हनुमान बारगजे, बबन तुपेरे, राहुल बेदमूथा, सुरेश पवार, दत्तात्रय खैरे, अनिता शिंदे, नारायण जायभाय अशा सर्वच अभ्यासू संचालकांचा समावेश आहे. अभ्यासू वृत्तीने ते सतत जनहितासाठी अग्रेसर असतात.

सुधीर राळेभात व प्रा. महादेव डुचे हे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या अभ्यासू वृत्तीने कामाचा ठसा उमटवलेले शेतकरी व व्यापारी यांना योग्य न्याय देणारे संचालक म्हणून ख्याती असलेले संचालक आहेत.

प्रा. डुचे यांनी गेली दहा वर्षे त्यांनी जामखेड बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. एक अभ्यासू संचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. तिसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी त्यांनी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत.

 

उमेदवारी अर्ज दाखल करताना गाजावाजा न करता जे मतदार आहेत त्यांना बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता मात्र मतदारच त्यांचा प्रचार करत आहेत.

प्रा. डुचे यांनी खुरदैठण सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच आपल्या कामाच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक अभ्यासू संचालक म्हणून ख्याती मिळविली आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार रोहीत पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी विकास पॅनलचे पुढील प्रमाणे उमेदवार आहेत

ग्रामपंचायत सर्वसाधारण
हनुमंत पाटील
शरद शिंदे

ग्रामपंचायत अर्थिक दुर्बल
हनुमान बारगजे

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती
बबन तुपेरे

व्यापारी मतदार संघ
राहुल बेदमूथा, सुरेश पवार

हमाल मापाडी मतदारसंघ
दत्तात्रय खैरे

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ
अंकुशराव ढवळे, सुधीर राळेभात, सतिष ढगे, कैलास वराट, शहाजी पवार, सतिश शिंदे, शिवाजी भोसले

संस्था मतदारसंघ महिला राखीव मतदारसंघ
रतन चव्हाण, अनिता शिंदे

सहकारी संस्था इतर मागासप्रवर्ग मतदारसंघ
महादेव डुचे

सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ
नारायण जायभाय

असे सर्व अभ्यासू व जनहिताची तळमळ असणारे उमेदवार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here