जामखेड बाजार समिती निवडणुकीत युवा नेत्यांमुळे चुरस आमदार रोहित पवारांबरोबर अमोल राळेभात तर आमदार प्रा. राम शिंदेंबरोबर प्रा. सचिन गायवळ

0
190

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समिती निवडणुकीत युवा नेत्यांमुळे चुरस

आमदार रोहित पवारांबरोबर अमोल राळेभात तर आमदार प्रा. राम शिंदेंबरोबर प्रा. सचिन गायवळ

 

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे दोन आमदारांबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ या दोन युवा नेत्यांच्या भोवती फिरू लागली आहे. या दोघांनीही दोन्ही बाजूला दिलेल्या पाठिंब्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या सहकार आणि शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलबरोबर सेवा सोसायटी मतदारसंघात वजनदार जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, संजय वराट, बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात, राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, हनुमंत पाटील, विश्वनाथ राऊत यांनी उमेदवारांना बरोबर घेऊन संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होईलच याचबरोबर ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल माथाडी मतदारसंघातून आपलाच विजय होईल, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

आमदार प्रा. राम शिंदे यांनी योग्य उमेदवार देत
शेवटच्या टप्प्यात तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, प्रदेश सरचिटणीस तथा हमाल पंचायत तालुकाध्यक्ष राहूल उगले यांच्या पुढाकाराने तालुका काँग्रेसने पाठींबा दिल्याने शिंदेंच्या बाजूने अनपेक्षित ‘पाठवळ’ वाढले आहे. आ. राम शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलला
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी पाठिंबा दिला आणि निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांची तालुक्यातील तरुण वर्गामध्ये मोठी ‘क्रेझ’ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, ही त्यांची जमेची बाजू आहे. तर ते स्वतः शेजारच्या
गावातून (धनेगाव) सोसायटीचे सदस्य झाले आहेत. ज्या भागात आ. राम शिंदे यांना मोठी अडचण होती, तो भाग प्रा. गायवळ यांच्यामुळे बहुतांशी सुरक्षित झाला आहे. प्रा. सचिन गायवळ यांच्या मुळे आमदार राम शिंदेंच्या पॅनेलला मोठी बळकटी मिळाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी विकास पँनलच्या प्रचाराची धुरा प्रा. सचिन गायवळ भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, उपसभापती रवी सुरवसे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, नानासाहेब गोपाळघरे हे सांभाळीत आहेत. त्यातच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे माजी सभापती शहाजी राजेभोसले, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सरचिटणीस राहूल उगले यांच्या नेतृत्वाखालील जामखेड तालुका काँग्रेस पक्षाने अखेरच्या टप्प्यात आ. राम शिंदे यांच्या पॅनेलला पाठिंबा देऊन धक्का तंत्राचा अवलंब केला आहे.

सुरुवातीला आमदार राम शिंदे हे या निवडणुकीत एकाकी पडले असे वाटत होते. परंतु त्यांना एकापाठोपाठ एका नेत्यांनी आमदार शिंदे यांच्या पँनलला जाहीर पाठिंबा मिळत गेल्याने चुरस वाढली गेली. या सर्व बाबींचा निवडणूकीच्या निकालावर कितपत परिणाम होतो. हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आणी हिच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगित तालिम ठरणार आहे. सध्या मात्र आरोपांच्या फैरी झडत आहेत. मोठी रंगत निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here