जामखेड न्युज——
जामखेड बीड रोडवर धुळीचे लोट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ठेकेदाराचे पाणी मारण्याकडे दुर्लक्ष
धिम्या गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक त्रस्त
जामखेड शहरातून पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. गोरगरीब लोकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतले मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तसेच आहेत काढून घेतलेल्या अनेक लोकांनी परत गाडे लावण्यास सुरूवात केली आहे. यातच हे प्रकरण कोर्टात गेले आहे. सहा आठवड्यात संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या बाजार समिती पासून पुढे काम सुरू आहे. रस्त्यावर कमी जास्त प्रमाणात मुरूम टाकलेला आहे. काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच काही ठिकाणी रस्ता खोदलेला आहे तेथे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. फलक नसल्याने अनेक अपघात होतात. तसेच वाहनाच्या वर्दळीमुळे धुराचे लोट ची लोट उठत आहेत याचा रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे. तसेच काही ठिकाणी मातीमिस्त्रीत मुरूम तर काही ठिकाणी दगडगोटे असलेला मुरूम टाकलेला आहे यामुळे अनेक गाड्या घसरून अपघात होतात तसेच
धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असून अत्यल्प प्रमाणात मारलेले पाणी लगेच सुकून जाते लगेच धुराचे लोट ची लोट उडत आहेत.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे वाहनांमुळे धुळीचे लोट उठत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीक या धुळीने त्रस्त झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली गोरगरिंबांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढले मात्र काही व्यापारी वर्गाचे अतिक्रमण अजूनही जैसे थे असल्याने धिम्या गतीने काम सुरू आहे. रस्त्याचे काम वेगाने सुरू करावे, रेंगाळलेल्या कामामुळे पावसाळ्यात नागरिकांना खुप अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तातडीने कामे सुरु करण्यात यावे अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना नागरिकांनी केली आहे.