जामखेड न्युज——
पत्रकार शिवाजी इकडे यांना मातृशोक
जामखेड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार शिवाजी इकडे यांच्या मातोश्री आसराबाई सोपान इकडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी झिक्री जामखेड रोडवरील इकडे वस्ती येथे आज दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले
मातोश्री आसराबाई यांच्या निधनाने इकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्रकार शिवाजी इकडे, निवेदक संभाजी इकडे अशी दोन मुले, तिन मुली, सुना व नातवंडे असा परिवार मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने झिक्री परिसरात शोककळा पसरली आहे.