जामखेड बाजार समिती निवडणुकीत मित्रपक्षाने काँग्रेसला विश्वासात घेतले नाही काँग्रेस कोणाला मदत करणार याकडे लागले लक्ष

0
164

जामखेड न्युज——

जामखेड बाजार समिती निवडणुकीत मित्रपक्षाने काँग्रेसला विश्वासात घेतले नाही

काँग्रेस कोणाला मदत करणार याकडे लागले लक्ष

कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड निवडणुकीत मित्र पक्षाने काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता निर्णय घेतले या संदर्भात जामखेड येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. 

या बैठकीत सर्वानुमते पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जामखेड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले,युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राहुल उगले यांना देण्यात आला आहे

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही महत्वाची निवडणूक आहे मात्र या निवडणुकीत मित्र पक्षाने विश्वासात न घेता निर्णय घेतला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत आता हे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या बैठकीसाठी जामखेड काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले,युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राहुल उगले,महिला तालुका अध्यक्ष ज्योतीताई गोलेकर,सोसायटी चेअरमन दादासाहेब पवार,चेअरमन अशोक पाटील,संचालक विकास पवार,ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब कोळपकर,राजेंद्र वालूंजकर,किसान कॉंग्रेस अध्यक्ष गौतम पवार, उपाध्यक्ष विशाल डूचे, उपाध्यक्ष भागीनाथ उगले, युवक चे तालुक़ा अध्यक्ष शिवराजे घुमरे, NSUI तालुक़ा अध्यक्ष आदेश सरोदे,अनिकेत जाधव,अंकुश मूसळे, जालिंदर शिंदे, भागवत काकड़े, पंकज विटकर आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here