जामखेड न्युज——
पशुपालकांनी पशुधनाची वेळोवेळी तपासणी करावी – डॉ. संजय राठोड
नगर जिल्ह्यातील पहिल्या डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक्ट लँबचा जामखेडमध्ये शानदार उदघाटन सोहळा संपन्न
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाने शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. शेतकरी वर्गाचे पशुधनाची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी पशूंची रक्त, लघवी, दुध तपासणी करणे आवश्यक आहे. सध्या जामखेड मध्ये हि सुविधा उपलब्ध झाली आहे याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड यांनी केले.
डॉ. नेटके पी. ए. बीव्हीएस्सी, एमव्हीएस्सी अँग्रो यांच्या नगर जिल्ह्यातील प्रथमच जामखेड शहरात
डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक्ट लँब जनावरांचे रक्त, लघवी, दुध, गोचीड ताप व इतर तपासणी लँबचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबन्चे भव्य उद्घाटन जामखेड मध्ये प्रथमच व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड व आंबी ता. भुमचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार देशमुख हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानेश्वर झेंडे होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पशुवैद्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल राळेभात, पशुवैद्यक क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. धारकर, डॉ. आटोळे, डॉ. मंडलीकर, श्री. पाचारणे तसेच डॉ. आबा बोराटे, डॉ. अनभूले, डॉ. घायतडक, डॉ. उबाळे, डॉ. भोरे, डॉ. मोरे, डॉ. विशाल बोराटे, डॉ. शिंदे, डॉ. लगस, डॉ. सचिन मुरूमकर, डॉ. जगताप, डॉ. डफाळ, डॉ. तानाजी राळेभात, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, यश ड्रायव्हिंग स्कुलचे संभाजी वटाणे, अर्जुन नेटके सर, गणेश नेटके सर, किसन वराट सर, भाजपा प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डेल्टा व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून
जामखेड व शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पशुधन आरोग्यविषयक रक्त, लघवी,दूध, गोचीड ताप व इतर तपासण्या केल्या जातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाशेवटी लॅबचे संचालक डॉ. नेटके पी. ए. यांनी सर्वांचे आभार मानले.