जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं एक ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यास सुरूवात केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर केंद्र सरकार इंधन दरवाढ करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं, त्यांचं हे ट्विट खरे ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्या ट्विट ची चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर हे चांगलेच व्हायरल झाले आहे.

आमदार रोहित पवार यांचे ट्विट
रोहित पवार यांनी २ मे रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एक ट्विट केलं होतं. आता चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलं आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांचं हे भाकीत खरं ठरल्याने चांगलीच चर्चा होत आहे.

आजचं ट्विट
आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असं सूचक विधान रोहित यांनी केलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये २७ फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले. तब्बल ६६ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियावर हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.