जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या आरोग्यावर विशेष लक्ष देत असले तरी यांचे वडील कृषिरत्न राजेंद्र पवार हे देखील कर्जत-जामखेडच्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करून कृषीक्रांती उदयास आणत आहेत. कोरडवाहू असलेल्या जमिनीवर नवीन वाण, तंत्रज्ञान, माहिती देण्यासाठी गावनिहाय शेतकरी बैठका घेऊन आपल्या हवामानानुसार कोणते पीक योग्य होईल आधुनिक पद्धतीने त्यांनी लागवड कशी करायची हे शिकवून त्यांनी अर्थकारणाचा खरा अभ्यास शेतकऱ्यांना शिकवला आहे.

बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी तुर संशोधन बदनापूर, संभाजीनगर या संशोधन केंद्राने विकसीत BDN -711 या तुरीच्या वाणाचा नफा तोटा समजावून सांगत आज कर्जतमध्ये १२५६० एकर आणि जामखेडमध्ये १२५०० एवढ्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली. या भागामध्ये मुख्यतः खडका हा वाण लागवड केला जात होता.यामध्ये साधारण एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळत होते परंतु BDN -711 हा तुरीचा वाण १३ ते १४ क्विंटल इतके उत्पादन देत आहे.हा फरक पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या वाणांची लागवड केली आहे.अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती,कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन ‘खरीप पुर्व पिक नियोजन अभियान २०२० आयोजित करण्यात आले होते.दोन्ही तालुक्यातील मुख्यत: तूर,उडीद,मुग,कांदा,तसेच फळबागेमध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब,अंजीर अशी पिकपद्धती आहे.

उडीदाचेही साधे वाण पेरण्याकडे जास्त कल होता.परंतु डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेल्या उडीदाचे TAU-1 हे वाण मोठ्या प्रमाणत उत्पादन देणारे ठरले आहे.साध्या वाणाचे ४ क्विंटल तर TAU-1 या वाणाचे एकरी ६ क्विंटल उत्पादण वाढले आहे. यामुळेच कर्जतमध्ये ११,२५० एकर आणि जामखेडमध्ये ५५,००० एकर एवढी उडीदाची लागवड करण्यात आली.फळबागेमध्येही लिंबू संशोधन केंद्र नागपूर यांनी लिंबाची विकसती केलेली NRCC-7, NRCC- 8 व साई सरबती या वाणाची ४८०० रोपे लागवड करण्यात आली.यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळजवळ ४ कोटींची वाढ झालेली आहे.खऱ्या अर्थाने कोरडवाहू जमिनीवर होत असलेली कृषीक्रांती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.