दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोरेश्वर देशमुख (नाना पाटील) यांचे कोरोनामुळे निधन – संस्थेचा स्पष्टवक्तेपणा असणारा ढाण्या वाघ हरपला

0
321
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव तसेच लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे मोरेश्वर देशमुख उर्फ नाना पाटील (वय ६३) याचे कोरोनामुळे पुणे येथे दुखद निधन झाल्याने दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा स्पष्टवक्तेपणा असणारा ढाण्या वाघ हरपला अशीच भावना सर्वानी व्यक्त केली.
       मोरेश्वर देशमुख हे जामखेड परिसरात नाना पाटील नावाने ओळखले जात होते. गेल्या वीस वर्षांपासून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत होते. सर्व संस्था पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून त्यांचा विश्वास संपादन करून संस्थेच्या भौतिक सुविधा बरोबरच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असत. तसेच लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष पदही सांभाळत होते.
           *शैक्षणिक कार्य*
जामखेड महाविद्यालय जामखेडला नॅक मानांकनात बी प्लस दर्जा मिळवून देण्यासाठी सर्व संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांना एकत्र घेऊन रात्रंदिवस काम करत ग्रामीण भागातील काॅलेजला शैक्षणिक बाबतीत शहरी रूप निर्माण केले भौतिक सुविधा प्राप्त केल्या, शैक्षणिक दर्जा उंचावले यामुळेच नॅक कमिटीत बी प्लस मानांकन मिळाले. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संस्थेच्या आवारात वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पाॅलिटिक्नीक काॅलेज उभे केले याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांच्यासाठी जामखेड पब्लिक स्कूल सुरू केले. जामखेड महाविद्यालय जामखेड ची भव्य इमारत, ल. ना होशिंग ची भव्य इमारत, विवेकानंद सभागृह, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृह या इमारतीच्या उभारणीत त्यांचा दुरदृष्टी पणा दिसुन येतो. स्वतःचे फारसे शिक्षण नसताना सुद्धा अंगभूत सदगुणाची कास धरून दुरदृष्टी पणामुळे मोठी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली. यामुळे अनेक दिवसांपासून ते दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी सचिव पद समर्थपणे सांभाळत होते.
        कृषी व डेअरी व्यवसाय 
  देशमुख हे शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत होते त्यामुळे कृषी क्षेत्रातही एक वेगळा ठसा उमटविला होता. डेअरी क्षेत्रात तर पाटील दुध नावाचा एक वेगळा ब्रॅन्ड तयार केला होता. सध्या त्यांच्याकडे ८५ म्हशी होत्या. शहरात एक उच्च दर्जाचे दुध म्हणून लोक रांगा लावून दुध खरेदी करत होते. एखाद्याला दुध मिळाले नाही तर तो दुसरीकडून दुध न घेता दुसर्‍या दिवशी लवकर दुध खरेदीसाठी आपला नंबर लावत होता सध्या जामखेड शहरात पाटील दुध म्हणून या दुधाचा मोठा नावलौकिक आहे.
     नाना पाटील : एक स्वयंभू  व्यक्तिमत्त्व
     जस जसा कारभार हाती आला तसं तशी याच्यातली उद्यमशीलता उफाळत राहिली आणि तो हळूहळू उन्नत होत गेला. या उन्नती बरोबर अंगातील पाटीलकीचं रक्त देखील उसळू लागलं आणि मग त्यान  नेटकं  समाजकारण सुद्धा सुरू केलं. त्याचीच परिणती म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष पद या नगर जिल्यातील महत्वाच्या संस्थांत तो भुषवित असलेली महत्वाची पदे !
       सध्या जामखेड नगरीतील प्रतिष्ठित जनांच्या गलबल्यात याचं नाव आदरानं  घेतल जात होत.
     पाटील यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे मोठा मुलगा वकिल तर लहान मुलगा पदव्युत्तर शिक्षण घेऊनही शेती व डेअरी पाटील दुध व्यवसाय सांभाळत आहे.
    पाटील यांच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता गेल्या आठ दिवसांपासून ते पुणे येथे कोरोना आजारावर उपचार घेत होते विशेष म्हणजे काल त्यांना बरे वाटत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला फोन करून मला जामखेडला घेऊन जाण्यासाठी ये म्हणून फोन करून सांगितलं होतं याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला यामुळेच दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा ढाण्या वाघ हरपला अशीच सगळीकडे चर्चा होती. त्यांच्या निधनाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष ,उपाध्यक्ष सहसचिव, खजिनदार व सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य , उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड मुख्याध्यापक व सर्व स्टाफ न्यु इंग्लिश स्कूल, राजुरी,  मुख्याध्यापक व सर्व‌‌‌ स्टाफ श्री भैरवनाथ विद्यालय, हाळगांव, मुख्याध्यापक व सर्व‌‌‌ स्टाफश्री साकेश्वर विद्यालय,  साकत, प्राचार्य व  सर्व स्टाफ जामखेड महाविद्यालय, जामखेड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here