जामखेड न्युज——
बाजार समिती निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावयाचा याचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेणार – शहाजीराजे भोसले
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही आमदारांनी कंबर कसली आहे. दुरंगी लढत होत आहे. भाजपाच्या विरोधात आमदार रोहित पवार व विखे पाटील गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत. उद्या पक्ष पदाधिकारी बैठक घेऊन कोणाला पाठिंबा द्यावयाचा याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजे भोसले यांनी दिली.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड 2023 ते 2028 या निवडणुकी साठी काँग्रेस पक्षा ची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात मंगळवार दिनांक २५ एप्रील २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यत आलेले आहे. सदर बैठकी चे आयोजन कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांच्या अध्यक्षते ख़ाली जामखेड येथे करण्यात आलेले आहे.अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव राहुल उगले यांनी दिली. सदर बैठकीस सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या पँनल बरोबर काँग्रेस पक्ष जाईल निश्चितच त्या पँनलचे पारडे जड होईल अशी चर्चा आहे.