मी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीला आमदार प्रा. राम शिंदे यांनी स्थगिती आणली – आमदार रोहित पवार समोरासमोर चर्चेसाठी मी तयार बाजार समितीत सहकार व शेतकरी विकास पँनलचे सर्वच उमेदवार निवडून येणार

0
287

जामखेड न्युज——

मी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीला आमदार प्रा. राम शिंदे यांनी स्थगिती आणली – आमदार रोहित पवार

समोरासमोर चर्चेसाठी मी तयार

बाजार समितीत सहकार व शेतकरी विकास पँनलचे सर्वच उमेदवार निवडून येणार

मतदारसंघासाठी पाठपुरावा करत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून आणली पण प्रा. शिंदे आमदार झाल्यावर अनेक कामांना स्थगिती. आपण किती कामे आणली मी किती आणली याची समोरासमोर चर्चा करू मी केव्हाही तयार आहे आपण म्हणाल तेव्हा मी कागदपत्रे घेऊन येतो असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 

आमदार राम शिंदे खर्ड्याच्या किल्ल्यावर समोरासमोर चर्चेला या मी शासनाकडे पाठपुरावा केलेली कागदपत्रे घेऊन येतो एकदा काय ते लोकांपुढे होऊन जाऊ द्या, खोटे आरोप करणारे व शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना मतदार जागा दाखला शिवाय राहणार नाही असा घनाघात आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. ते खर्डा येथे जामखेड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलत होते.


यावेळी कर्जत जामखेड मतदार संघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे, सुरेश भोसले, मंगेश आजबे, संजय वराट, सुधीर राळेभात, विजयसिंह गोलेकर, काकासाहेब गर्जे, सरपंच आसाराम गोपाळघरे, राजेंद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आमदार रोहित पवार बोलताना पुढे म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून प्रत्येक कामात प्रमाणिकपणे काम करीत आहे कागदपत्राचा पाठपुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे. तुम्ही तर आमदार झाल्यावर मी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचे काम करीत आहात हे सर्व जनता पाहत आहे शेतकरी विरोधी भूमिका घेऊन आपण बारामती ऍग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला, मागील निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन बाजार समिती ताब्यात घेतली पणन मंत्री असताना मार्केट कमिटी साठी किती निधी आणला किती विकास केला,गृहराज्यमंत्री असताना कुसडगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र जळगावला कसे गेले होते, खर्ड्याचे पोलीस स्टेशन आपल्या कारकिर्दीत कसे मंजूर झाले नाही असे प्रश्न उपस्थित केले, मी साधा आमदार असताना पोलीस प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेडला आणले खर्डा येथे पोलीस स्टेशन मंजूर करून प्रत्यक्षात ते सुरू झाले आहे खोटे बोलून विकास होत नसतो, शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी खर्डा येथे तीन हजार मेट्रिक टनाचे वखार महामंडळाचे गोडाऊन उभे केले आहे.

मार्केट कमिटी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल असे म्हणले.येणाऱ्या जामखेड मार्केट कमिटीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सहकार व शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .

या कार्यक्रमास सर्व उमेदवार सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी बंधू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here