आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वतीने सत्तार शेख यांचा सत्कार

0
178

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वतीने सत्तार शेख यांचा सत्कार

जामखेड टाइम्सचे संपादक सत्तार शेख यांची ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटनेच्या (डिजीटल विभाग) अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे साहेब व जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज चोंडी येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला आहे.

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजीटल विभागाचे काम महाराष्ट्रात मोठ्या वेगाने सुरु झाले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात संघटन बांधणी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी जामखेड येथील धडाडीचे पत्रकार सत्तार शेख यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड केली. व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्तार शेख हे गेल्या 15 वर्षांपासून ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत आहे. आजवर त्यांनी विविध दैनिकांमध्ये काम केले आहे. सध्या ते जामखेड टाइम्स या न्यूज पोर्टल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमांतून डिजीटल पत्रकारितेत सक्रीय आहेत. शेख यांचा राज्यभरात दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा मोठा फायदा संघटनेला होणार आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, माजी सभापती तुषार पवार, सरचिटणीस लहू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, मार्केटचे माजी सभापती गौतम उत्तेकर, सचिन घुमरे, वैजीनाथ पाटील, डाॅ गणेश जगताप, मकरंद काशिद, हळगावचे उपसरपंच आबासाहेब ढवळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, जालिंदर चव्हाण, गणेश लटके, डाॅ ससाणे, मच्छिंद्र गिते, विष्णू भोंडवे, उध्दव हुलगुंडे सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here