जामखेड न्युज——
मतेवाडी येथील शेतकरी पुत्राची भरारी, अतुल मते मंडल कृषी अधिकारी पदी निवड
गावकऱ्यांनी काढली सवाद्य मिरवणूक
तालुक्यातील मतेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अतुल मते मंडल कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. गावातील पहिलाच तरूण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. कृषी विभाग स्पर्धा परीक्षा उतीर्ण होण्याचा मान मिळाला त्यामुळे गावकऱ्यांनी अतुल मते याची सवाद्य मिरवणूक काढत त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मतेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील लताबाई मते व भारत मते यांचा मुलगा अतुल भारत मते लोकसेवा आयोग कृषी विभाग स्पर्धा परीक्षा उतीर्ण झाला. अतुल मते याचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतेवाडी व माध्यमिक शिक्षण जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण हे दादा पाटील महाविद्यालय कर्जत जि अहमदनगर येथे तर कराड येथे पदवी चे शिक्षण घेतले तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पदवीत्तर { एम एस सी कृषी } झाले राहुरी येथेच लोकसेवा आयोगाची कृषी विभाग स्पर्धा परीक्षा पूर्व एप्रिल २०२२ ला तर मुख्य परीक्षा ऑक्टोंबर २०२२ ला झाली तर ,मुलाकत १२ एप्रिल २०२३ ला तर निकाल १३ एप्रिल २०२३ ला लागला त्यामध्ये मंडळ कृषी आधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने मतेवाडी, जवळा हाळगाव व पंचक्रोशी तील नागरिकांनी सत्कार करण्यात आला.
यावेळी शेतकरी नेते मंगेश अजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सुंदरदास बिरंगळ , सरपंच लक्ष्मण मते, शहाजी पाटील, मच्छिंद्र सुळ, प्रदीप दळवी, नारायण पगिरे, रघुनाथ मते, भाऊसाहेब कसरे, अशोक पठाडे, सावता हजारे, अविनाश पठाडे, यादव भाऊसाहेब, भोजने सर, फटागडे सर, , काशिनाथ मते, चंद्रहार पागीरे, ग्रां प. सदस्य, मिञ परीवार, नातेवाईक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन नारायण पागीरे, यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश लेकुरवाळे व तत्याराम मते यांनी केले
विद्यार्थ्यांना मी कायम मार्गदर्शन करणार – अतुल मते
ग्रामीण भागातील लोकांमध्ये शैक्षणिक माहिती व सुविधा आभाव व मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्याने गावातील एकाही विद्यार्थीने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला विद्यालय , महाविद्यालय मध्ये मार्गदर्शन मिळत गेले त्याचा फायदा करत लोकसेवा आयोग कृषी विभाग स्पर्धा परीक्षा उतीर्ण होण्याचा पहिला मान मला मिळाला आहे. त्यामुळे मी आई वडील व गावातील नागरिकांनी जो सत्कार केला त्यांचे कायम ऋणी राहील . तसेच गावातील विद्यार्थ्यांना मी कायम शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करत राहणार असल्याचे मत अतुल मते यांनी बोलताना व्यक्त केले.