राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये जामखेडच्या खेळाडूंना तीन कांस्यपदक

0
139

जामखेड न्युज——

राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये जामखेडच्या खेळाडूंना तीन कांस्यपदक

 

ऑल महाराष्ट्र वुशु असोशिएशनच्या मान्यतेने, वुशु असोशिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर आयोजित राज्यस्तरीय सिनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धा वेरूळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत जामखेड चे खेळाडू रोहित थोरात,शादाब शेख व महेश कुमटकर यांनी कांस्यपदक मिळविले. या खेळाडूंना अहमदनगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व राष्ट्रीय वुशु प्रशिक्षक लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.

रोहित थोरात,शादाब शेख व महेश कुमटकर यांनी कांस्यपदक मिळवल्यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या तिन्ही खेळाडू व मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्रशिक्षक लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष शाम पंडित यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here